स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक कारवाईवेळी अभिनंदन यांनी देशासाठी दाखवलेल्या धाडसाबाबत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं.

पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं.

विमान दुर्घटना झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅराशूटने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैन्यानं ताब्यात घेतलं.

पाकिस्तानी सैन्यानं प्रचंड मानसिक अत्याचार करत अभिनंदन यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण या दबावाला बळी न पडता पाकच्या ताब्यात असतानाही अभिनंदन यांनी प्रचंड धैर्य दाखवलं. अभिनंदन यांच्या धाडसाचं देशातच नाही तर देशाबाहेरही कौतुक झालं. अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्ताननं अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं. 

कारगिल युद्धानंतर 2000 मध्ये अखेरचं ‘वीर चक्र’ देण्यात आलं होतं. एकविसाव्या शतकात कोणत्याही जवानाचा ‘वीर चक्र’ने गौरव झालेला नाही. अभिनंदन यांना ‘वीर चक्र’पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे करणार पूरस्थितीची पाहणी

-डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करणार नाहीत!

-“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत

-राजस्थानमध्ये पोषण आहारातून 36 मुलांना विषबाधा

-पूरग्रस्त भागात शरद पवार स्वातंत्र्यदिन साजरा करणार