मिलिंदच्या न.ग्न फोटोला पाठींबा देणाऱ्या अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ! एबीएपीने उचललं तिच्याविरुद्ध पाऊल

मुंबई| अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणच्या न.ग्न फोटोंची चर्चा खुपचं रंगली आहे. अशातच आता मिलिंद सोमनची तूलना नागा साधूंसोबत करणाऱ्या अभिनेत्री पूजा बेदीचा अखिल भारतीय अखाडा परिषदेने (एबीएपी) निषेध नोंदवला आहे.

एबीएपीचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी याबाबत म्हणाले की, पूजा बेदीला नागा परंपरेबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पुढील वर्षी हरिद्वार येथे होणाऱ्या महाकुंभमध्ये येण्यासाठी आम्ही पूजा बेदीला आमंत्रित करणार आहोत. जेणेकरुन तिला नागा साधूंबाबत थोडंफार ज्ञान मिळेल.

तसेच नागा सन्यासींची एक परंपरा आहे. त्याची तुलना एखाद्या मॉडेल अथवा अभिनेत्याच्या न.ग्नतेशी अथवा अ.श्लीलतेशी करणे चुकीचे आहे. पूजाने काही वेळ कूंभ मेळ्यात घालवायला हवा. तिथे तिने नागा साधूंच्या कठीण तपश्चर्या पाहायला हव्यात, असंही ते म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमण याने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यू.ड होऊन पळतानाचा एक फोटो काढला. त्या वेळी त्याची पत्नी त्याच्या सोबत होती.

तो फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्या फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं होतं. यानंतर मिलिंदवर अनेकजण टीका करु लागले आहेत.

याप्रकरणी मिलिंदविरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या फोटोशूटवर राजकिय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत तक्रार नोंदवली आहे. मिलिंद सोमण यांच्याविरुद्ध कलम 294 आणि कलम 67 अंतर्गत गु.न्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा सुरक्षा मंचने सोमण यांनी न्यू.ड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मिलिंदवर काही जणांनी टीका केल्यानंतर तसेच त्याच्याविरोधात गु.न्हा नोंद झाल्यानंतर अभिनेत्री पूजा बेदी मिलिंदच्या पाठीशी उभी राहिली आहे.

मिलिंदचा बचाव करण्यासाठी तिने एक ट्विट केले. त्यामध्ये तिने म्हटले होते की, मिलिंद सोमणच्या या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारची अश्लीलता नाही. अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. न.ग्नता एक अपरा.ध असेल तर सर्व नागा बाबा लोकांना तु.रुंगात टाकले पाहिजे. केवळ शरीरावर राख रगडणे स्वीकाराहार्य होणार नाही.

 

View this post on Instagram

 

Happy birthday to me ! . . . #55 📷 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘या’ बड्या अभिनेत्रीचा वरून धवनवर चोरीचा आरोप

धक्कादायक! बॉलीवूडच्या आणखी एका बड्या अभिनेत्याची गळफा.स घेवून आत्मह.त्या

बॉलीवूड मधून अचानक गायब झालेल्या ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली त्यावेळी माझ्यासोबत…

अर्णव गोस्वामींचं थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन! म्हणाले खेळ तर आत्ता सुरु झालाय….

कंगनानं उलघडलं बॉलीवूडचं ‘ते’ काळं सत्य, सरकार सोबत अभिनेत्यांच्या बायकांवर गंभीर आरोप करत म्हणाली…