काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?

नवी दिल्ली | देशात सुरु असलेले भाजपविरोधी वारे आणि त्यांचे विरोधी पक्षांसोबत असलेले राजकारण यावरुन भाजपच्या विरोधात सध्या सगळेच पक्ष सक्रिय झाले आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्यावर असलेली ईडीची (ED) टांगती तलवार याच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. त्यांच्यावर कथित नॅशनल हेराल्डचा घोटाळा याप्रकरणी आरोप आहेत.

अखेर आता काँग्रेसला (INC) नवीन अध्यक्ष मिळणार आहेत. त्यानिमित्ताने काँग्रेसचा अध्यक्षपदाचा शोध देखील थांबणार आहे. येत्या 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण असणार आहे? हे मात्र अद्याप कळू शकले नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढविल्यास काँग्रेसला घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपादाच्या निवडणुकीच्या नामांकनाची तारीख ठरविण्यासाठी लवकरच काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावली जाणार आहे. आणि त्यात अध्यक्षपदासाठी नावे निश्चित होणार आहेत.

पुढील महिन्यात म्हणजे 7 सप्टेंबर रोजी काँग्रेसची 3500 किमीची पदयात्रा सुरु होत आहे. या यात्रेत राहुल गांधी सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीअगोदरच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे.

सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. तसेच काही काळापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी होते. परंतु अनेक निवडणुकांत काँग्रेसचा दारुन पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे आता अध्यक्षांच्या निवडीसाठी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. काही नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधीच नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतात, असा दावा काही नेत्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाब एन. व्हि. रमणांचा महत्वपूर्ण निर्णय

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये असंतोष? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

विनायक मेटे अपघात प्रकरण : नवीन माहिती समोर, दोन गाड्या करत होत्या…

“एक गट अन् बारा भानगडी”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

मेटे यांचा मृत्यू संशयास्पद; त्यांच्या पत्नीचा दावा, म्हणाल्या …