‘या’ योजनेत महिन्याला 95 रुपये भरा आणि व्हा लखपती

नवी दिल्ली | भारतीय पोस्ट (Indian Post) आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबवीत असते. त्यातील एक योजना म्हणजे, ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना.

या योजनेत दररोज 95 रुपये जमा केल्यास योजनेचा अवधी संपल्यानंतर ग्राहकाला जवळपास 14 लाख रुपये मिळू शकतात. (Gram Sumangal Gramin Dak Jeevan Vima)

ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना या नावावरुनच या योजनेमागील प्रधान हेतू स्पष्ट होतो. तो म्हणजे ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी आहे.

देशातील ग्रामीण भागातल्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना पोस्टाने आणली आहे. समाजातील आर्थिक दृषट्या मागास असलेल्या लोकांना या योजनेचा अधिकाधीक लाभ मिळावा, हा देखील या योजनेमागचा हेतू आहे.

पोस्ट ऑफिसची ही योजना 1995 साली सुरु करण्यात आली. ही एख मनी बॅक पॉलिसी आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाला मध्ये मध्ये काही रक्कम देण्यात येणार आहे.

सदर योजना 15 वर्षे आणि 20 वर्षे या दोन प्रकारांमध्ये उपल्बध आहे. सदर पॉलिसी घेण्यासाठी संबंधीत ग्राहकाचे वय कमीत कमी 19 वर्षे असावे, अशी अट घालण्यात आली आहे.

भारतीय पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) या योजनेची संपूर्ण माहिती दिली गेली आहे. तसेच ही योजना अधिकृत संकेत स्थळावरुन देखील खरेदी केली जाऊ शकते.

 

महत्वाच्या बातम्या –

‘सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील सभेत गोंधळ’

राजस्थानात 90 आमदारांनी काँग्रेसला राजीनाम्याची धमकी दिली; केली ‘ही’ मोठी मागणी

रायगडावर शिवाजी महारांच्या समाधीस्थळी पिंडदानाचा प्रकार उघड; व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत

संतोष बांगर यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया; “माझी बहीण आणि पत्नी जर…”

अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका; म्हणाले, पुढील दहा जन्म तुमची…