देश

मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?; वाचा संपूर्ण माहिती

मुंबई | लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक विशेष सेवा आजपासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. दिल्लीला जोडणाऱ्या 15 रेल्वे गाड्या धावणार आहेत. याशिवाय मजुरांसाठी श्रमिक स्पेशल गाड्याही धावणार आहेत. मुंबईतून आज विविध राज्यांसाठी 5 श्रमिक गाड्या धावणार आहेत.

पुण्यातून येत्या 8 दिवसात 23 गाड्या सोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरांचल, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या रेल्वेगाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या मजुरांसाठी पुढील आठ दिवसात 23 रेल्वे सोडण्यात येणार आहेत.  तसेच येत्या दोन दिवसात 150 बसेसही सोडल्या जाणार आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली.

रेल्वे पोलिसांकडून फक्त आरक्षित तिकीट असलेल्या व्यक्तींना स्टेशनवर सोडलं जात आहे. सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अ‌ॅपचीही सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य सेतू अ‌ॅप असल्याशिवाय कोणत्याही प्रवाशाला प्रवास करता येणार नाही, असं पत्रक रेल्वेने जाहीर केलं आहे.

दरम्यान, आजपासून पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील 15 राजधानी मार्गावर 30 फेऱ्या धावणार आहेत. या विशेष रेल्वे नवी दिल्ली, आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी या 15 शहरांमधून सुटणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल”

-राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

-गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही

-युवक काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद