“पुढील 50 वर्ष भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजी राहणार”

नवी दिल्ली | कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेसह शेअर बाजाराला मोठा फटका बसला. कोरोना काळात सेनसेक्समध्ये मोठी घट झाली आणि सेनसेक्स 30 हजारापर्यंत गडगडला.

कोरोनानंतर हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येऊ लागल्याने काही प्रमाणात उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा वाढ पहायला मिळाली.

सध्या शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळत आहे. आज सेनसेक्स 40 हजार 433 वर बंद झाला आहे. तर निफ्टी देखील 18 हजार 044 वर पोहचली आहे.

गेल्या 4 महिन्यात शेअर बाजारात नवनवीन रेकाॅर्ड देखील नोंदवले गेले आहेत. अशातच अमेरिकेतील दिग्गज गुंतवणुकदार मार्क माॅबियस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतात पुढील 50 वर्ष शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येईल, असं मार्क माॅबियसने म्हटलं आहे. पण काही काळ थोड्या प्रमाणात मंदी देखील दिसेल. मात्र, तेजीचा काळ नक्कीच जास्त असेल, असंही मार्क माॅबियस यांनी म्हटलं आहे.

मार्क माॅबियसने यांनी ब्लमबर्ग टीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने हे वक्तव्य केलं आहे. भारत आज ज्या स्थानी आहे तिथं चीन 10 वर्षापूर्वी होता, असंही मार्क म्हणतात.

सर्व राज्यात एकसारखे कायदे लागू केल्याचा फायदा भारताला होईल, असंही मार्क म्हणाले आहेत. भारत सरकारच्या धोरणांमुळे त्याचा फायदा भारताला दिर्घकालिन स्वरूपात होईल, असंही मार्क माॅबियस म्हणतात.

गेल्या काही वर्षापासून तैवान शेअर बाजारात पडझड पहायला मिळत आहे. त्यामुळे आता भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी आहे, असं मत देखील मार्क माॅबियस यांनी व्यक्त केलं आहे.

मार्क माॅबियस हे अमेरिकेतील दिग्गज गुंतवणुकदार आहेत. मार्क माॅबियस यांनी नुकतंच भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. मार्क माॅबियस यांच्या या वक्तव्याचा परिणाम येत्या काळात शेअर बाजारात दिसू शकतो.

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांचा मोठा पैसा आहे. अनेकदा मंदीच्या काळात परदेशी गुंतवणूकदांनी निर्गुंतवणूक केल्यास त्याला फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलेला देखील पहायला मिळतो.

थोडक्यात बातम्या –

“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?” 

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार