भारतीय संघात नाही पण ‘हा’ खेळाडू ‘या’ कारणामुळे असणार संघासोबत!

मुंबई : भारतीय संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला नेट गोलंदाज म्हणून संघाबरोबर ठेवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. सैनीने 3 ऑगस्टला वेस्ट इंडीज विरुद्ध फ्लोरिडा येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

तसेच 2019 विश्वचषकादरम्यान तो भारतीय संघाला नेटमध्ये सराव देणाऱ्या गोलंदाजांपैकी एक होता. आता त्याला कसोटी क्रिकेटसाठीही तयार करत असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

नवदीप सैनीला संघ व्यवस्थापनाने कसोटी मालिकेसाठी संघाबरोबर राहण्यास सांगितले आहे. तो संघाबरोबर नेट बॉलर म्हणून असेल. भविष्याच्या दृष्टीने त्याला कसोटी क्रिकेटसाठी तयार करायचे आहे, असं बीबीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सैनीने मागील काही वर्षात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे गती आहे आणि तो चेंडूची हवेत दिशा बदलू शकतो आणि पिच करु शकतो. जर त्याला चांगले तयार केले तर अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजांची संख्या वाढेल. संघ व्यवस्थापनाचा त्याच्यासाठी हाच विचार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??

-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप

-शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…

-‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा