भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली | आयपीएल 2020 मधील 14वा सामना हैद्राबाद सनराइझर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये काल खेळला गेला. हैद्राबाद सनराइझर्सनं या सामन्यात सीएसके विरुद्ध विजय मिळवला आहे. हैद्राबाद सनराइझर्सच्या प्रीयम गर्ग या खेळाडूमुळे हा सामना जास्त चर्चेत आहे.

प्रीयम गर्गनं या सामन्यात नाबाद अर्धशतक खेळी खेळली. प्रियमच्या या उत्कृष्ट खेळीच्या जोरावरच हा सामना हैद्राबाद सनराइझर्सच्या नावावर झाला आहे. प्रीयमनं 23 चेंडूत अर्धशतक करत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा तुफानी अर्धशतकाचा रेकॉर्ड मोडला आहे.

प्रीयमपूर्वी रोहित आणि विराटच्या नावावर 24 चेंडूत अर्धशतक करण्याचं रेकॉर्ड होतं. मात्र, प्रीयमनं त्यांचं हे रेकॉर्ड मोडलं आहे. प्रीयम आयपीएलमध्ये प्रथमच खेळत आहे. प्रीयम गर्गनं सिएसके सारख्या बलाढ्य संघविरुद्ध आयपीएल मधील आपलं पहिलं अर्धशतक केलं आहे.

सीएसके सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 19 वर्षीय प्रीयमनं फास्टेस्ट फिफ्टीचं रेकॉर्ड केल्यानं प्रीयमनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सामन्यात प्रीयमनं 26 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या आहेत. प्रीयमनं खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 196.15 इतका होता.

चेन्नई सुपर किंग्ज आणि हैद्राबाद सनराइझर्स यंच्यातील हा सामना खूपच रोमांचक झाला. हैद्राबाद सनराइझर्सनं मात्र 69 धावांवर त्यांचे टॉपचे 4 खेळाडू गमावले होते. संघाचा तुफानी फलंदाज शून्यावर बाद झाला तर मनीष पांडेला केवळ 29 धावा करता आल्या. यानंतर डेव्हिड वॉर्नर 28 धावांवर तर केन विल्यम्स 9 धवांवरच बाद झाला होता.

संघाला धावांची गरज असतानाच प्रीयम गर्ग मैदानात उतरला. प्रीयमनं अभिषेक शर्माबरोबर 77 धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या 146 असताना अभिषेक 24 चेंडूत 32 धावा बनवून बाद झाला. यानंतर प्रीयमन नाबाद 20व्या ओव्हरपर्यंत संघाची धावसंख्या 164 पर्यंत नेली.

प्रीयम गर्ग आणि अभिषेक शर्माची जोडी आयपीएल मधील सर्वात कमी वयात अर्धशतक बनवणारी जोडी बनली आहे. या दोघांनी संजू सैमसन आणि ऋषभ पंत यांचं रेकॉर्ड तोडलं आहे.

प्रीयम आणि अभिषेक यांच्या जोडीनं चेन्नई विरुद्ध 39 वर्ष 335 दिवसांच्या वयात 77 धावांची भागीदारी केली आहे. तर संजू आणि ऋषभ यांच्या जोडीनं 2016 मध्ये हैद्राबाद विरुद्ध 40 वर्ष 39 दिवस वयात 72 धावांची भागीदारी केली होती. आता प्रीयम आणि अभिषेकच्या जोडीनं वय आणि धावा या दोन्हीत संजू आणि ऋषभला मागे टाकलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!

महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर