Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात भारत बजावणार ‘ही’ महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली |  रशिया-युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता पंधरा दिवसांचा कालावधी झाला आहे. दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांविरूद्ध त्वेषानं लढत आहे.

रशियानं युक्रेनच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना आळा घालण्यासाठी युद्धाची घोषणा केली होती. जगातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत.

जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र आमसभेत देखील रशियावर अनेक प्रकारची निर्बंध लादण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतरही युद्ध चालूच आहे.

भारतानं या प्रकरणात तटस्थ राहाण्याचं धोरण स्विकारलं होतं. आता भारत युक्रेनमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ग्रुपचा हिस्सा होणार आहे.

युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धाला थांबवण्यासाठी भारत जगातील इतर देशांसोबत कार्य करणार आहे. परिणामी आता रशिया या प्रकरणी काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

युक्रेनमधील संकट संपवण्यासाठी कुटनिती आणि शांततेच्या मार्गानं चर्चा करण्यास भारत इतर देशांना साथ देणार आहे, असं भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्य टीएस तिरूमुर्ती यांनी म्हटलं आहे.

युक्रेनसाठी सध्या भारतातून अनेक प्रकारची मदत पाठवण्यात येत आहे. अत्यावश्यक गोष्टींची गरज सध्या युक्रेनला आहे, असंही तिरूमुर्ती म्हणाले आहेत.

दरम्यान, भारत अन्य देशांसोबत संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारानं युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

 “महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!