भारत-चीनमधील तणाव निवळला; दोन्ही देशांनी सैन्य माघारी बोलावलं

लडाख | प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवरुन या दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. अखेर दोन्ही देशांनी याप्रकरणी माघार घेतली आहे.

पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे, तसेच त्यांनी आपली वाहनं देखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानं देखील आपलं सैन्य माघारी घेतलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये सुसंवाद घडल्याची माहिती समोर आली होती. परस्पर सहमतीनं दोन्ही देशांनी यावर तोडगा काढल्याचं बोललं जातंय.

सोमवारी रात्रीपासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीननं सैन्य हटवल्यानं भारतानं देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या सैन्याला माघारी बोलावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला रुग्णालयात हलवलं, अहवालात कोरोना झाल्याचं उघड

-‘निसर्ग’मुळे कंबर मोडलेल्या कोकणवासियांना शरद पवारांनी असा दिला धीर

-रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री…; राष्ट्रवादीचं राजनाथ सिहांना सणसणीत प्रत्युत्तर

-महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी- राजनाथ सिंह

-….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे