वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. भारत-पाकिस्तानला आवश्यक वाटल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 26 ऑगस्ट रोजी जी 7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचं मत ट्रम्प यांच्या भेटीनंतर मोदी यांनी व्यक्त केलं.
सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहित आहे. पण दोन आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जेवढा तणाव होता. तो आता कमी झाला आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
जुलै महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत भारतानं त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता.
दरम्यान, जी 7 परिषदेदरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचं सांगत यामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आवश्यक नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
महत्वाच्या बातम्या –
नेता व्हायचं असेल तर अधिकाऱ्यांची कॉलर पकडायला शिका; ‘या’ नेत्याचा विद्यार्थ्यांना सल्ला- https://t.co/meVCxHhlNW #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
“संभाजी भिडेंची ISROच्या प्रमुख पदी नियुक्ती करा”- https://t.co/FsBAmATdgH #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्ता द्या- सुप्रिया सुळे- https://t.co/OANfLlrnQj #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019