जळगाव | इंदुरीकर महाराज यांनी जळगावमध्ये ऑनलाईन शिक्षणाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले आहेत त्यांना नोकरी मिळणार नाही, असं कीर्तन चालू असताना इंदुरीकर महाराज म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी, आणि बुद्धी चेक करुन पगार दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात, विज्ञाना बरोबर अध्यात्म द्या पुढची पिढी घडेल अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या किर्तनातून मुद्दे मांडले.
कोरोना काळात खरं काम कुणी केलं असेल तर पोलीस खात्याने काम केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले कोरोना काळातील खरे योद्धे हे आपले पोलीसच होते, असंही त्यांनी सांगितलं.
इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आणि वादग्रस्त वक्तव्य हे प्रकरण राज्यातील नागरिकांना नवं नाही. कधी महिलांविषयी, तर कधी राजकारणाविषयी तर कधी कीर्तन देत असूनही त्यांनी वारकरी पंथाविषयीही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत .
महत्त्वाच्या बातम्या-
शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती
“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य