इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

संगमनेर | सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, या वादग्रस्त वक्तव्यामुळं किर्तनकार इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत आले. आता संगमनेर कोर्टात इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला जावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून बरेच प्रयत्न केले गेले. अखेरीस संगमनेर कोर्टात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी आपल्या किर्तनातून अनेकदा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्वलंत विषयावर भाष्य केलं आहे. मात्र महाराजांचं हे वक्तव्य त्यांना चांगलच अंगलट आल्याचं पहायला मिळत आहे.

नाशिक जवळच्या ओझर येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर सर्व स्तरातून महाराजांवर टीकेची झोड उठली होती. आता कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानं इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत.

 

-“पवारांचं वय, अनुभव पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

-ठाकरे सरकार भक्कम आहे, विरोधकांना मुर्खांच्या नंदनवनात राहू द्या- शरद पवार