“माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून कोट्यधीश झाले त्यांचं वाटोळं होईल, त्यांची मुलं….”

अकोला | माझ्या जीवावर 4 हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल, असं कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.

सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं. यावेळी इंदुरीकर महाराज बोलत होते.

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे.

अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली.

कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे इंदुरीकर (Indurikar Maharaj) आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची” 

पंजाबमध्ये फक्त आप, झाडू करणार बाकी सगळे साफ; जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज 

उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार?, वाचा एक्झिट पोलचा अंदाज 

दोन विमानं समोरा समोर, ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या 

“येणारे येतीलच पण पंतप्रधानपदाची खुर्ची नशिबी येणार नाही हे मात्र नक्की”