आता इंदुरीकरांची शिक्षकांवर टीका; शिक्षकी पेशाची खिल्ली उडविणारा व्हिडीओ व्हायरल!

अहमदनगर | अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसात चांगलेच चर्चेत आहेत. ओझरमधील किर्तनातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यावरुन ते चांगलेच गोत्यात आले आहेत. त्यांनी शिक्षकी पेशाची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शिक्षक वर्गात वेळ कसा वाया घालवतात? याबाबत बोलताना शिक्षकांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आहे. त्यांच्या या टीकेवर शिक्षक संघटना चांगलीच संतापली आहे.

शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आहे हे इंदुरीकर महाराज सांगू पाहात आहेत मात्र त्यांनी ते स्वतः शिक्षक आहेत हे विसरु नये, असं काही शिक्षकांनी सुचवलं आहे. स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करु नये, असंही काही शिक्षकांनी सुचवलं आहे.

शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे असे मत अ‌ॅक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शिक्षकांवर अशा प्रकारे भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अरविंद सावंतांना लॉटरी; मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

-शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालांनी दिली मोदींना आमंत्रणाची हाक!

-कार्यकर्त्यांनो थोडं दमांनं घ्या; …नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार

-व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाण रंगले प्रेमरंगात; ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गायलं गाणं

-शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारली जाणार; अजित पवारांची घोषणा