खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

मुंबई | सध्या सर्वत्र दिवाळीत तयार केलेला फराळांची सर्वजण चव घेत आहेत. अशातही अनेकांनी आपल्या परिवारासह बाहेर जेवणाचा बेत आखला आहे. मात्र, आता खवय्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.

दिवाळीतील काही दिवसांच्या सुट्ट्यानंतर आता हाॅटेलमध्ये जेवायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी हाॅटेल मालक संघटनांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यभरातील सर्व रेस्टाॅरंट मालकांना 30 टक्के दरवाढ करण्यासाठी आता कंबर कसली आहे. राज्यात सर्वत्र महागाई वाढली असताना आता जेवण सुद्धा महागणार आहे.

पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, या गोष्टींनी महागाईचं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशातच आता रेस्टाॅरंटमधील पदार्थ महागणार म्हणल्यावर खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

इंधन दरवाढीमुळं हाॅटेल व्यवसायापुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. इंधन महागल्यानं वाहतूक महाग झाली आहे परिणामी व्यावसायिक आता दर वाढवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

हाॅटेल व्यवसायीकांची राज्य संघटना असलेल्या आहार संघटनेनं 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व हाॅटेल व्यावसायिकांनी या महिन्यापासून दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं सध्या महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅससोबतच आता व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

हाॅटेलमध्ये वापरण्यात येणारे व्यावसायिक सिलेंडर 1000 च्या घरात पोहचले आहे. परिणामी हाॅटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. म्हणूनच खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीनं गेली दी़ड वर्षे झालं हाॅटेल व्यवसाय पुर्णपणे कोलमडला होता. आता कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथीलता आल्यानं हाॅटेल व्यवसाय पुन्हा चालू झाला आहे. पण महागाईनं सर्व व्यवस्थापन कोलमडलं आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमिवर राज्यात लवकरच हाॅटेलमध्ये जेवणाचे दरसुद्धा वाढणार असल्यानं खवय्या नागरिकांना चिंता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“नवाब मलिकांच्या विरोधातील सगळे पुरावे मी शरद पवारांना देणार”

 सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

  कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

  अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक

  कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ