सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार

मुंबई | 1 एप्रिलपासून ग्राहकांवरचा महागाईचा (Inflation) बोजा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, एसी, फ्रीजसह मोबाइल वापरणंही महागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget) अनेक उत्पादनांवरच्या आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली होती.

काही उत्पादनांवरच्या शुल्कात कपातही केली होती. नवीन शुल्क 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे ज्या कच्च्या मालावरचं उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे, त्यांच्याशी संबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

सरकारने 1 एप्रिलपासून अ‍ॅल्युमिनियम धातूवर 30 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. याचा वापर प्रामुख्याने टीव्ही (TV), एसी (AC), फ्रीज आणि हार्डवेअरमध्ये केला जातो.

कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यानं कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरचं आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार आहेत.

सरकारने मोबाइल फोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिंटेज सर्किट बोर्डवरही कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्क लागू केलं आहे. म्हणजेच बाहेरून या उत्पादनांची आयात आता महाग होणार असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होणार आहे.

सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून, मोबाइलच्या (Mobile) किमती वाढू शकतात, असं मत ग्रॅंट थ्रॉन्टन या अमेरिकी फर्मने व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…म्हणून ईडीने धाड टाकली”, सतीश उकेंच्या अटकेनंतर नाना पटोलेंचे गंभीर आरोप 

IPL 2022: ना मुंबई ना दिल्ली, मॅथ्यू हेडन म्हणतो ‘हा’ संघ यंदा IPL जिंकेल

IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ

Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने दिलं गुडीपाडव्याचं खास गिफ्ट