कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

पुणे | सिनेमातील दृश्य डोळ्यासमोर उभी राहावी अशी काराकिर्द गाजवणारे पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस कृष्णप्रकाश आता वादात अडकले आहेत.

कृष्णप्रकाश यांची काही दिवसांपूर्वीच पुण्यातून बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी  बदली रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या देखील चर्चा होत्या.

आता राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी कृष्णप्रकाश यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळं राज्य पोलीस विभागात परत एकदा खळबळ माजली आहे.

गेल्या वर्षभरापासून गृहविभागावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अशात आता कृष्णप्रकार यांच्या नावाचा समावेश झाल्यानं चर्चांणा उधाणं आलं आहे.

जमीन खरेदी विक्रीतून कृष्णप्रकाश यांनी तब्बल 200 कोटी रूपये मिळवल्याचं एक पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता आमदार बनसोडे यांनी या पत्रासारखीच भाषा वापरल्यानं वाद वाढला आहे.

झारखंडचे असणारे कृष्णप्रकाश हे हजारीबाग येथील रहीवासी आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याकडं एकुण शेकडो एकर जमीन आहे. त्यांच्या आई-वडीलांच्या नावे ही जमीन आहे.

महाराष्ट्रात सेवेत असणारे कृष्णप्रकाश यांनी राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता घेतली आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, देहूगाव, बाणेर, कुपवाड या ठिकाणी त्यांची जमीन आणि प्लाॅट्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं’; दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 ‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?

 “14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा

 “आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले