मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार भांडण चालू आहे. एनसीबीच्या कारवाईनंतर हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभं ठाकले आहेत.
देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पदासोबतच फडणवीस यांच्याकडे राज्याचं गृहमंत्री पद देखील होतं. आता याच कार्यकाळातील कामांवरून नवाब मलिक यांनी फडणवीस यांना घेरलं आहे.
फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात गुंडांना वाचवण्याचं काम केल्याची गंभीर टीका मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती.
मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. फडणवीस यांनी बर्नार्ड शाॅ यांच्या एका सुविचाराचा आधार घेत मलिक यांना सुनावलं होतं.
डुकराच्या नादी लागायचं नाही हे मी आधिच शिकलो आहे, असं फडणवीस म्हणाले होते. यावर मलिक यांनी त्यांना इंन्सान इंन्सान होता है, हे अजून कळालं नाही, असं म्हटलं आहे.
भाजपचे नेते असंही माणसांना कुत्र्याची मांजराची उपमा देत असताता. फडणवीस यांनी माझ्यावर तशी टीका केली यातून त्यांची संस्कती दिसून येते, असं मलिक म्हणाले आहेत.
एनसीबीच्या कारवाईवरून सुरू झालेला हा गोंधळ सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबला आहे. फडणवीस आणि मलिक यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला आहे.
फडणवीस यांच्यावर मलिक यांनी गृहमंत्री असताना राज्यात अनेक कुख्यात गुंडांना वाचवल्याचा गंभीर आरोप केला होता. इतकच नाही तर 14 कोटींच्या खोट्या नोटांचा घोटाळा दाबल्याचा आरोपही फडणवीस यांच्यावर मलिक यांनी केला होता.
मलिक यांच्या आरोपानंतर सतत आक्रमक भासणारे फडणवीस एकदम शांत कसकाय झाले याची चर्ची सध्या राज्यात चालू आहे. मलिक आणि फडणवीस वादानं राज्याची चर्चा सध्या देशात होत आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या टीकेनंतर राज्यात गोंधळाला सुरूवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा
“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”
“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”
मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’
‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत