वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या अंगावर पडले होते किडे, परिस्थिती वाचून तुम्हालाही रडू कोसळेल

मुंबई | मनोरंजन विश्वाला एक मायानगरी म्हटलं जातं. कित्येक लोक या मायानगरीत नवी स्वप्न घेऊन येतात. परंतु यातील मोजकेच लोक कलाविश्वात टिकून राहतात आणि यशाच्या शिखरावर पोहचतात. या मायानगरीत येणाऱ्या प्रत्येकच नवख्या कलाकाराला अनेक वेगवेगळ्या आवाहनांना सामोरं जावं लागतं.

सध्या मनोरंजन विश्वात जे कलाकार यशाच्या शिखरावर आहेत त्या कलाकारांच्या आयुष्यात देखील खूप संघर्ष होता. या कलाकारांना देखील अनेक अवाहानांना सामोरं जावं लागलं आहे. यापैकीच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेत्री निशा नूर यांचं.

निशा नूर यांनी ऐंशीच्या दशकात दक्षिणात्य चित्रपटांमधून अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. निशा यांचा जन्म 18 सप्टेंबर 1962 साली तंबरम येथे झाला होता. म्हणजेच आज निशा नूर आपला 59वा वाढदिवस साजरा करत असत्या.

निशा नूर यांनी अगदी कमी वेळात दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपली जागा निर्माण केली होती. एकापेक्षा एक हीट चित्रपट त्या देत होत्या. 1981 साली आलेला ‘टिक टिक’ हा त्यांचा पहिला हीट चित्रपट होता. यानंतर अय्यर द ग्रेट, कल्याण अगातिगल, अशा अनेक हीट चित्रपटांमध्ये निशा यांनी काम केलं.

निशा या उत्तम अभिनय तर करतच होत्या. परंतु त्याबरोबरच त्या दिसायला देखील खूप सुंदर होत्या. निशा यांची एक झलक पाहण्यासाठी त्याकाळात त्यांचे चाहते मरत होते. परंतु एका घटनेनंतर निशा यांना मिळालेली लोकप्रियता रातोरात कमी होऊ लागली.

चित्रपट सृष्टीत काम मिळणं बंद झालं. यानंतर नाईलाजास्तव निशा यांना चित्रपट सृष्टी सोडली. याकाळात त्यांना बऱ्याच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं. पुन्हा काही दिवसांनी निशा यांना वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्याच्या बातम्या समोर आल्या.

2007 साली निशा एका दर्ग्याच्या बाहेर पडलेल्या आढळल्या. यावेळी त्यांच्या अंगावर किडे मुंग्या रेंगाळत होत्या. दर्ग्याबाहेर जेव्हा त्या सापडल्या तेव्हा त्यांना कोणीच ओळखू शकलं नव्हतं. ओळख पटल्यानंतर निशा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना एड्स झाल्याचं यावेळी समजलं. काही दिवसांनी उपचारादरम्यान निशा यांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीतील सिव्हिल डिफेन्सच्या जवानाला भररस्त्यात मारहाण…; पाहा व्हिडीओ

माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ

…म्हणून करीना-दीपिका नव्हे तर कंगना करतेय ‘द इनकारनेशन सीता’मध्ये मुख्य भूमिका

‘…अन् रात्री झोपताना कोणीतरी माझा गळा दाबायचं’; हेमा मालिनींनी सांगितला भयाण किस्सा!

‘करिश्माने माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं’; पतीच्या गंभीर आरोपानंतर करिश्माने…