मुंबई | काल हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीत मोठा राडा झाल्याची घटना घडली होती. दिल्लीच्या जहांगीर पुरी भागात मोठा मोठा हिंसाचार झाला आहे. हनुमान जयंती साजरी केली जात असताना मोठा गोंधळ उडाला.
एका जमावाने गोंधळ घालत गाड्यांची तोडफोड केली. तर यावेळी गोळीबार देखील झाला होता. त्यानंतर आता दिल्लीत पलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे आणि तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञान आहे. त्याचबरोबर संयमी आणि ज्ञानी आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
देशातील हा व्यापक दंगलीचा कट आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील दंगली घडवण्याचे प्रयत्न होत आहेत. पण हा कट यशस्वी होऊ देणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टोले लगावले आहेत. अयोध्या सर्वांची आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी सर्वांनी जाऊन दर्शन घ्यावं, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपने ज्याप्रकारे ओवैसीचा वापर केला. त्याचप्रकारे त्यांनी नव हिंदू ओवैसीचा वापर करणार आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरे यांना चिमटे काढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला पुण्यातून बाहेर पडायचंय, पुण्यावर भयंकर संकट कोसळलंय”, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत
पुढील 5 दिवस महत्त्वाचे! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
“राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची जागा घेणार”
‘आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत’; राज ठाकरेंचा इशारा
सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये