IPl 2021: शतकाच्या जवळ असताना पडिक्कल म्हणाला, ‘मॅच संपवून टाक’; विराट कोहलीनं दिलं मन जिंकणारं उत्तर

मुंबई| देवदत्त पडिक्कलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक झळकावलं. या सामन्यात देवदत्त पडिक्कलनं 52 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. यात 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

या सामन्यात 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युवा देवदत्त पडिक्कल याने केलेली शतकी निर्णायक ठरली होती. त्याच्या शतकामुळे आरसीबीनं या सिझनमधील सलग चौथा विजय मिळवला आहे. या खेळीबद्दल आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली यानं देवदत्तचं कौतुक केलं आहे. देवदत्तनं मागच्या सिझनमध्येही चांगली कामगिरी केल्याची आठवण विराटनं करुन दिली.

शतकाच्या उंबरठ्यावर असताना देवदत्त पडिक्कलने विराट कोहलीला सामना संपवून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर विराट कोहलीने पडिक्कलला जे उत्तर दिले ते वाचून तुम्ही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

विराटनं मॅचनंतर सांगितलं की, “देवदत्त जबरदस्त खेळाडू आहे. मी त्याला 40-50 रन झाल्यानंतर आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला होता. माझ्या मते टी 20 क्रिकेटमध्ये पार्टरनरशीप महत्त्वाची असते. आम्ही पुढं देखील चांगली कामगिरी करु.” विराटंही नाबाद 72 रनची खेळी केली. मात्र विराट सुरुवातीला आक्रमक नव्हता. त्यावेळी देवदत्तनं फटकेबाजी करत वेगानं रन जमवले.

विराट पुढे म्हणाला की, देवदत्त पडिक्कल शतकाच्या उंबरठ्यावर होता. तेव्हा त्याने मला सांगितले की, तू तुझे फटके खेळ. माझ्या अनेक खेळी अजून बाकी आहेत. मात्र मी त्याला म्हणालो की, जर हे तुझे पहिले शतक नसते तर मी असे केले असते. तू तुझे शतक पूर्ण कर. दरम्यान विराटच्या या सल्ल्यानंतर देवदत्तने फटकेबाजी सुरू ठेवत आयपीएलमधील आपले पहिले शतक पूर्ण केले.

‘हे शतक माझ्यासाठी खास आहे. मी फक्त याची वाट पाहू शकत होतो. जेव्हा करोनाग्रस्त होतो. तेव्हा वाटलं होतं की, मी पहिला सामना खेळेन. मात्र तसं झालं नाही. संघाच्या विजयात योगदान देण्यास इच्छुक होतो. आज खेळपट्टी चांगली होती. चेंडू बॅटवर येत होता. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.’ असं देवदत्तने सामना संपल्यानंतर सांगितलं.

आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यानंतर करोनावर यशस्वीरित्या मात करत देवदत्त संघात परतला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता.

दरम्यान, आयपीएलमध्ये देवदत्त पाडिक्कल हा शतक ठोकणारा 37 वा खेळाडू आहे. आतापर्यंत 18 भारतीय आणि 19 परदेशी खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. सर्वाधिक शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. विराट कोहली 5 शतकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या –

काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती…

हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट अन्…,…

कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने…