IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, कर्णधार के एल राहून ‘या’ आजारामुळे रुग्णालयात दाखल

मुंबई| इंडियन प्रीमीयर लीग 2021 च्या हंगामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. असे असतानाच पंजाब किंग्स संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कर्णधार के एल राहुलला अपेंडिक्समुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पंजाब किंग्जने ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

पंजाब किंग्सने दिलेल्या माहितीनुसार के एल राहुलच्या शनिवारी रात्री अचानक पोटात दुखू लागलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. के एल राहुलवर एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र ती आता होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

केएल राहुलवर शस्त्रक्रिया झाल्यास त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल आणि अशा परिस्थितीत तो आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पंजाब संघाला मोठा धक्का बसणार आहे. राहुल सध्या लीगमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. त्याने 7 सामन्यांत 331 केल्या असून त्याच्याकडे ऑरेंज कॅपचा मानही आहे.

पंजाबने आत्तापर्यंत आयपीएलच्या 14 व्या हंगामात 7 सामने खेळले असून 3 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे 6 गुणांसह ते 5 व्या क्रमांकावर आहेत.

पंजाबचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मयंक अग्रवालही दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, त्यामुळे पंजाबला आता हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात…

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन,…

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी,…

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं…