IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्रू अनावर, पाहा भावूक करणारे फोटो

नवी दिल्ली| आयपीएल 2021 ही स्पर्धा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फारच निराशाजनक ठरली आहे. संघाला सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागत असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेत, नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचा कर्णधारपदावरुन पायउतार केला आहे.

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या खराब कामगिरीमुळे सनरायझर्सच्या फ्रँचायझीने डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढून टाकले. त्यामुळे आता संघाची कमान केन विल्यमसनच्या हातात आहे. या निर्णयानंतर सगळीकडे खळबळ उडाली.

परंतु त्यापेक्षा वॉर्नर सोबत वाईट घडले ते म्हणजे राजस्थान विरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानच मिळाले नाही.

वॉर्नरनं 2014 साली हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याच्यावर टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेल्या वॉर्नरची हकालपट्टी अनेक क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. त्यातच राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नरचा व्हारल झालेला एक फोटो पाहून क्रिकेट फॅन्स चांगलेच हळहळले आहेत.

या सीझनमध्ये हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकता आला. आणि पाच वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे, हैदराबाद आयपीएलच्या पाॅईंट टेबलमध्ये सगळ्यात शेवटी आहे. अशा परिस्थितीत संघाने वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूला कर्णधारपदावरून दूर करण्याचा मोठा निर्णय घेतला.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये वॉर्नर मान खाली घालून निराश अवस्थेमध्ये दिसत आहे.

हैदराबाद टीमचा सहकारी त्याची समजूत घालत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वॉर्नरला टीमच्या बाहेर बसवणाऱ्या हैदराबादच्या निर्णयावर क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केलीय.

डेव्हिड वॉर्नरला  राज्यस्थानसोबच्या मॅचमध्ये खेळाला न मिळाल्याने तो इतका भावूक झाला की, त्याला त्याचे अश्रू आवरले नाही आणि तो मॅच दरम्यान रडू लागला. खरंच ज्या टीमला विजेतेपद जिंकवून दिले, त्या टीममध्ये खेळायला न मिळणे हे किती वेदनादायी असू शकते याचा अंदाज तुम्ही या फोटो वरुन लावू शकता.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

…..म्हणून मला माझा गोरा रंग आवडत नाही, कंगना रणौत…

कोरोना लढ्यात आता विराट-अनुष्काचा पुढाकार, व्हिडीओ शेअर करत…

कोरोनातून बरं झाल्यानंतर आजीने डॉक्टरांना मारली मिठी, पाहा…

कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद…

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy