IPL 2021: के. एल. राहूलऐवजी ‘हा’ खेळाडू झाला पंजाबचा कर्णधार

मुंबई| इंडियन प्रीमीयर लीग 2021 च्या हंगामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. असे असतानाच पंजाब किंग्स संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कर्णधार के. एल. राहुलला अपेंडिक्समुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पंजाब किंग्जने ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

आता पजांब किंग्जचे सुत्र कोणाच्या हातात देणार हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु नंतर प्रीती झींटाने या प्रश्नांच उत्तर ट्वीटमार्फत चाहत्यांना दिले आहे. तिने जाहीर केले की, पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवाल संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणार आहे.

पंजाब किंग्सने दिलेल्या माहितीनुसार के एल राहुलच्या शनिवारी रात्री अचानक पोटात दुखू लागलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. के. एल. राहुलवर एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र ती आता होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

पंजाबने आत्तापर्यंत आयपीएलच्या 14 व्या हंगामात 7 सामने खेळले असून 3 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे 6 गुणांसह ते 5 व्या क्रमांकावर आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: पंजाबला मोठा धक्का, कर्णधार के एल राहून…

‘दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात…

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन,…

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी,…