IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

अहमदाबाद| इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात 26 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात पार पडला. हा सामना पंजाबने 34 धावांनी जिंकला. पंजाबच्या या विजयात हरप्रीत ब्रारने त्याच्या अष्टपैलू खेळीने महत्त्वाचे योगदान दिले.

हरप्रीत ब्रार पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. हरप्रीतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रवी बिश्नोईने 2 विकेट्स घेत हरप्रीतला चांगली साथ दिली. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले होते.

पंजाबचे पाच गडी बाद झाल्याने संघाची धावसंख्या मंदावली होती. मात्र केएल राहुल आणि हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या गड्यासाठी चांगली भागिदारी केली. त्यामुळे पंजाबला 179 धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुलला बंगळुरुच्या विरुद्धच्या सामन्यात लय सापडली. मात्र दुसऱ्या फलंदाजांची त्याला साथ मिळताना दिसली नाही. त्याने 57 चेंडूत 91 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे.

केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. आक्रमक खेळी करणारा ख्रिस गेल 46 धावा करुन बाद झाला. या खेळीत ख्रिस गेलनं कायल जेमिसनच्या गोलंदाजीवर 5 चौकार ठोकले. कायलच्या षटकात 20 धावा आल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांवर दडपण आलं होतं. मात्र डॅनियल सॅमच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सने यष्टीमागे त्याचा झेल घेतला.

ख्रिस गेल बाद झाल्याने बंगळुरुच्या गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले शाहरुख खान आणि दीपक हुड्डाही मैदानावर तग धरु शकले नाहीत. निकोलस पूरन आणि प्रभसिमरन सिंगही स्वस्तात बाद झाले.

बंगळुरुला देवदत्त पडिक्कलच्या रुपानं पहिला धक्का बसला आहे. रिले मेरेदिथच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने 6 चेंडूत 7 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली 35 धावा करून तंबूत परतला. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. तर दुसऱ्या चेंडूवरच ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतरच्या षटकात एबी डिव्हिलियर्सलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

विजयी अंतर कमी करण्यासाठी रजत पाटिदारने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्नही अपयशी ठरला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर शाहबाज अहमदही बाद झाला.

लगेचच दुसऱ्या चेंडुवर रवि बिश्नोईने सॅमचा त्रिफळा उडवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हर्षल पटेलनं 13 चेंडूत 31 धावांची खेळी केली. मात्र विजयी अंतर खूप असल्याने त्याचा फायदा झाला नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रवि बिश्नोईने त्याचा अप्रतिम झेल घेतला.

पंजाबचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय असून आरसीबीचा दुसरा पराभव आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…

‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’…

मराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला…

धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे…

‘दोस्ताना 2’ नंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन…