मुंबई| आयपीएल 2021 ची रणधुमाळी आजपासून सुरू असून होणार आहे. स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या बड्या लढतीनं होणार आहे. भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील हा महामुकाबला चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल. मॅच अगोदर काही तास ट्विट करत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.
कोहलीने आपल्या ट्विटरवरुन 4 फोटो शेअर केले आहेत. “मी फोकस्ड आहे… आणि पुढे जाण्यासाठी मी तयार आहे”, असं म्हणत त्याने आरसीबी मुंबईला नमविण्यासाठी सज्ज असल्याचं एकप्रकारे ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
विराट कोहलीची टीम आरसीबीसाठी पहिला सामना सोपा नसणारे. 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स देखील आयपीएल 2021 ची सुरुवात विजयाने करण्यासाठी उत्सूक आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरंल.
आरसीबीची बॅटींग नेहमीप्रमाणे यंदाही मजबूत आहेत. या सिझनमध्ये त्यांनी कायले जेमिन्सन आणि डॅन ख्रिस्टीन हे ऑल राऊंडर घेत टीम संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या टीममध्ये मोहम्मद अझहरुद्दीन हा युवा विकेट किपर देखील आहे. आरसीबीची बॅटींग मजबूत असली तरी त्यांची टीम बॉलिंगमध्ये चहल आणि सुंदरवर अवलंबून आहे.
विराट कोहली, एबी डीविलीर्स, युझवेन्द्र चहल असे स्पेशालिस्ट खेळाडू असून देखील आरसीबीचा खेळ म्हणावा तसा चांगला झाला नाही. परंतु यंदा ग्लेन मॅक्सवेल च्या रूपाने आक्रमक फलंदाज आणि काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असल्याने आरसीबीचा संघ थोडा तगडा वाटतो. पण बलाढ्य मुंबई विरुध्दचा सामना नक्कीच त्यांच्यासाठी सोप्पा नसेल.
रोहित शर्माची मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात बलाढय टीम असून आत्तापर्यंत मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव कायरन पोलार्ड जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या सारखे मातब्बर खेळाडू असून मुंबईचा संघ तगडा आहे. कर्णधार रोहित शर्मा चे कल्पक नेतृत्व मुंबईसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
या स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही कॅप्टन्सच्या टीम पहिल्या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहेत. या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी दोन्ही टीमनं योग्य अंतिम 11 खेळाडू मैदानात उतरवणे आवश्यक आहे.
Focused & ready to go.#playbold @RCBTweets pic.twitter.com/HeIRkiQ3P5
— Virat Kohli (@imVkohli) April 8, 2021
महत्वाच्या बातम्या –
काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली…
मुव्ही माफियांच्या भितीनं ‘या’ अभिनेत्यानं केला…
‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची…
इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने…
‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ