मुंबई | आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला आता सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या सामन्यांना आता दमदार सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर राजस्थान राॅयल्स आणि सनराईजर्स हैदराबादमध्ये पाचवा सामना खेळवला गेला.
राजस्थान आणि हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा घाम काढला. सलामीवीर जाॅस बटलर आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर आलेल्या कॅप्टन संजू सॅमसंगने गोलंदाजांची धू धू धुलाई केली.
संजूने 27 चेंडूत 55 धावांची आक्रमक फलंदाजी केली. त्यानंतर देवदत्त पेडीकलने देखील धुवाधार फलंदाजी केली. दोघांनी मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला.
मात्र, देवदत्तच्या फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थानने दिलेल्या 211 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी आल्यानंतर 4 चेंडूवर केन विल्यमसनची विकेट मिळाली.
कृष्णाच्या चेंडूवर कट करण्याच्या प्रयत्नात केन कॅच किपरकडे गेला. मात्र, किपर संजू सॅमसंगला कॅच पकडता आला नाही. झेप टाकून कॅप घेण्याच्या प्रयत्नात झेप संजूक़डून सुटला आणि स्लीपला थांबलेल्या देवदत्तकडे हा कॅच गेला.
देवदत्त पेडिक्कलने समोर जाऊन कॅच झेलला. त्यावेळी बाॅल त्याच्या हाताच्या पुढे टप्पा पडल्याचं पहायला मिळालं. मात्र, त्याची बोटं चेंडूच्या खाली असल्याचं थर्ड अंपायरने सांगितलं आणि केन विल्यमसनला बाद केलं.
अंपायरच्या या निर्णयावर हैदराबादचे समर्थक नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. तिसऱ्या अंपायरने क्षेत्ररक्षणाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर केन निघून गेला, असं ट्विट करत हैदराबादने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पेडिक्कलचा हा कॅच सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर आता नवीन वाद होण्याची शक्यता देखील आहे.
पाहा व्हिडीओ-
How do you give that out? pic.twitter.com/nC2oE7m9bI
— Rohit Sankar (@imRohit_SN) March 29, 2022
Kane departs after 3rd Umpire gives the decision in favor of the fielding side.😟
SRH: 3/1 (2)#ReadyToRise #OrangeArmy #TATAIPL2022 #SRHvsRR
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 29, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज