मुंबई | मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघात आज आयपीएलचा 30 वा सामना खेळला (IPL 2022) जाणार आहे. पाच वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकणारा मुंबईचा संघ आणि चार वेळा ट्राॅफी जिंकणारा चेन्नईचा संघ सध्या पाॅईट टेबलच्या पायथ्याशी आहे.
मुंबईच्या डीवाय स्टेडियमवर पुन्हा मुंबई आणि चेन्नई आमने-सामने येणार आहेत. यंदा मेगालिलावात दोन्ही संघाने आपापले महत्त्वाचे खेळाडू गमावले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघ कमकुवत झाल्याचं दिसतंय. मात्र, पारंपारिक प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध सामना असल्याने चाहते आतुर झाले आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा संघ 32 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी 19 वेळा मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 13 वेळा चेन्नईच्या संघानं मुंबईला पराभूत केलं आहे.
मुंबईसाठी सर्वात मोठी चिंता कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म. त्याला मागील काही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी ,मुरुगन अश्विन यांना देखील काही खास कामगिरी यंदा करता आली नाही.
चेन्नईचा ऋतुराज गायकवाड सध्या फाॅर्ममध्ये असल्याने त्याच्यावर चेन्नईच्या फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. जडेजा आणि धोनीला देखील आजच्या सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यात दोन्ही संघाची तुलना बरोबरीने होत असल्याने आता मैदानात खेळाडू कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे भाई भाई भाई! हलगीच्या तालावर तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
“राज ठाकरेंचे बोल आधी गुलूगुलू वाटायचे, आता खाजवायला होतंय”
लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण, भाजप आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Maruti Suzuki XL6 Facelift: हायटेक फिचर्ससह भारतीयांची आवडती कार लाँच; किंमत पण फारच कमी
CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!