IPL 2022: हार्दिक पांड्या वादाच्या भोवऱ्यात! LIVE सामन्यात शमीला दिली शिवी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | IPL च्या 15 व्या हंगामाला (IPL 2022) आता रंग चढू लागला आहे. यंदा 10 संघ असल्याने यंदा अधिक टफ लढती पहायला मिळत आहे. नव्याने सामील झालेली गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे.

काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्समध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्सने गुजरातचा पराभव करत विजय रथ रोखला. त्यामुळे काल गुजरातला पहिल्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं.

अशातच काल सामन्यात घडलेल्या एका घटनेमुळे आता क्रिकेटविश्वाची मान खालावल्याचं पहायला मिळत आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातने 161 धावा केल्या होत्या. यात हार्दिक पांड्याच्या संयमी अर्धशतकाचा देखील समावेश आहे. त्यानंर हैदराबादची फलंदाजी सुरू असताना हार्दिकने गोलंदाजीची कमाल आपल्या खांद्यावर घेतली.

कर्णधार हार्दिक 13वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी गुजरातला विकेटची गरज होती. हार्दिकने टाकलेल्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने अपर कट मारला आणि तो चेंडू मोहम्मद शमीकडे गेला.

शमी आरामात कॅच पकडेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र, शमीच्या दोन पाऊलं आधी हा चेंडू पडला. शमीने पुढे ढाय टाकून पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कॅप पकडला आला असता.

याच कारणावरून कर्णधार हार्दिकचा पारा चढला. त्याने थेट शमीला झापलं. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!

“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”

शरद पवारांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले… 

“कायद्यापासून पळू नका सांगणारे आता *** पाय लावून पळतायेत”