कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

मुंबई | IPL 2022 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई दरम्यान गुरूवारी पार पडलेल्या सामन्यानंतर प्ले ऑफचा रस्ता आणखी बिकट झाला आहे.

चेन्नई आणि मुंबई हे संघ आयपीएलची ट्राॅफी सर्वात जास्त वेळा उंचावणारे संघ आहेत. मात्र, या हंगामातून हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत.

चेन्नई आणि मुंबई बाहेर पडले असले तरी प्ले ऑफच्या शर्यतीत आणखीन चुरस निर्माण झाली आहे. गुजरात हा एकमेव संघ प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं करू शकला आहे.

गुजरात पहिल्या क्रमांकावर, लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राजस्थान, बंगळुरू, हैदराबाद या संघाची देखील प्ले ऑफवर नजर आहे.

पहिल्याच सिझनमध्ये खेळणारे गुजरात आणि लखनऊ हे संघ यावर्षी जोरदार फाॅर्मात आहेत. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे अनुक्रमे लखनऊ आणि गुजरातचं नेतृत्व करत आहेत.

स्पर्धेत प्ले ऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला तर स्पर्धेबाहेर पडणारा मुंबई पहिला संघ ठरले आहेत. तब्बल पाचवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईला यंदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही.

दरम्यान, आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीतील सामने हे कोलकत्यात खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर 

“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती” 

“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…”