IPL 2022: धोनीनंतर CSKचा कॅप्टन कोण?, सुरेश रैनाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई | आयपीएल (IPL 2022) म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक प्रकारचा उत्सवच असतो. आयपीएलच्या 15 व्या हंगामसाठी आता येत्या 26 तारखेपासून चुरस पहायला मिळणार आहे.

यंदा आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ असणार आहे. त्यामुळे यावेळी आयपीएलची मजा आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे. सर्व संघ आता प्रॅक्टिस सेशनमध्ये वेगवेगळ्या स्टॅट्रजी आखत आहेत.

भारताचा माजी कॅप्टन आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गत वर्षी  आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. अशातच आता या आयपीएलनंतर धोनी कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, धोनीनंतर आता चेन्नईचा कर्णधार कोण?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर आता धोनीचा साथीदार आणि चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनाने मोठं वक्तव्य केलं आहे.

चेन्नईकडे रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो यासारखे खेळाडू आहेत. हे सर्वजण महेंद्रसिंग धोनीचे उत्तराधिकारी होऊ शकतात, असं रैना म्हणाला आहे. यात सर्वात आघाडीवर जडेजाचं नाव आहे, असंही तो म्हणाला.

दरम्यान, सुरेश रैनाला मागील आयपीएल हंगामानंतर चेन्नईने रिलीज केलं होतं. त्यानंतर झालेल्या मेगालिलाव रैनाला कोणच्याही संघाने विकत घेतलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022: ना रोहित, ना विराट! आकाश चोप्रा म्हणतो ‘हा’ खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणार

Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले

 “भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका

Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”

Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा