कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द न होता या महिन्यात रंगणार IPL चे सामने

मुंबई | कोरोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र आता ती 15 एप्रिल रोजी सुरू होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं बुधवारी सर्व व्हिसा 15 एप्रिल पर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आयपीएल स्पर्धा लांबली असली तरी मात्र क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी गोष्ट आहे. कारण आयपीएल रद्द करण्याचा विचार चालू होता. त्यामुळे स्पर्धा रद्द न होता आयपीएलचा थरार येत्या एप्रिल महिन्यात रंगणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

“इकडचा कोणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही… तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या”

-‘हवा येऊ द्या’मध्ये शाहू महारांजांचा आणि सयाजीराजेंचा अपमान?

-आमदारांच्या चालकांचा पगारही आता सरकार देणार

-रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग, मुख्यमंत्र्यांचा शब्द

-नाम फाऊंडेशनला मिळणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्यांचा पैसा जातो कुठे? – तनुश्री दत्त