IPL Auction 2022 : लिलावात दिल्ली कॅपिटल्स लावणार ‘या’ 10 खेळाडूंवर बोली

मुंबई | आयपीएलच्या मेगा लिलावासाठी काही तासांचा कालावधी बाकी असताना अनेक टीमच्या गुपित गोष्टी आणि त्यांच्या रणनिती समोर येत आहेत. मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरमध्ये (IPL Auction 2022) पार पडणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धत एकूण 590 खेळाडू ऑक्शनसाठी उपलब्ध असून त्यामधील साधारण 200 खेळाडूंची निवड 12 तारखेला आणि बाकी खेळाडूंचा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऑक्शनमध्ये होणार आहे.

मागील दोन सिझनपासून सातत्यानं चांगली कामगिरी करत प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं देखील संघाचं व्यवस्थित नियोजन केलं आहे.

आमच्याकडे एक ओपनर, एक विकेटकिपर-बॅटर, एक फास्ट बॉलर आणि एक ऑल राऊंडर आहे. आम्हाला टीम सतुंलित करणारे 7 खेळाडू हवे आहेत, असं दिल्ली कॅपिटल्सचे असिस्टंट कोच प्रवीण आम्रे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे दिल्ली यंदा 3 बॅटर, 1 विकेटकिपर-बॅटर, 4  स्पिनर आणि 2 फास्टरला टार्गेट करणार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचबरोबर 2 ऑलराऊंडर देखील घेण्याच्या प्रयत्नात दिल्ली असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने यंदा ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि नॉर्खिया या चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे ऑक्शनसाठी 47.5 कोटी रूपये शिल्लक आहेत.

दिल्ली कॅपिटल्सकडे 21 जागा आता शिल्लक असून त्यामध्ये विदेशी खेळाडूंच्या रिक्त जागेची कमाल मर्यादा 7 आहे. त्यामुळे आता दिल्लीला देसी डावपेच खेळावे लागणार आहेत.

दरम्यान, आम्हाला एक संतुलित टीम हवी आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये तरूण आणि अनुभवी, नवोदित तसंच सिनिअर खेळाडूंचे मिश्रण दिसेल, असं वक्तव्य कोच प्रवीण आम्रे यांनी वक्तव्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही आवरेना ‘पुष्पा’चा मोह, म्हणाले “फ्लावर भी और फायर भी”

झिका व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झालाय?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

IPL Auction 2022: मेगा लिलावापूर्वी रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

तरुण पिढीत वेगानं पसरतोय ‘हा’ आजार; सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय व्हिडीओ

IPL Auction 2022: बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; ‘या’ 3 खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी