भररस्त्यात तरुणानं मुलीचं अ.पहरण करण्याचा प्रयत्न केला, मग लोकांनी चांगलाच धुतला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल पब्लिक रिअॅक्शन व्हिडीओ खूप जास्त पाहायला मिळतात. लोक अशा व्हिडीओजला चांगलीच पसंती दर्शवत असतात. काहीवेळा हे रिअॅक्शन व्हिडीओ कॉमेडी असतात तर काहीवेळा पब्लिक ट्रायलसाठी केले जातात.

रिअॅक्शन व्हिडिओमध्ये कॅमेरा अशा ठिकणी लपवून ठेवला जातो ज्या ठिकाणी लोकांचं लक्ष जाणार नाही. यानंतर लोकांचं लक्ष वेधून घेणारा एखादा पब्लिक स्टंट केला जातो आणि त्या गोष्टीवर लोक काय रिअॅक्ट होतात, हे कॅमेऱ्यात कै,द केलं जातं.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा भररस्त्यात तरुणीचं अप.हरण करण्याचा प्रयत्न करतो. तो एका मुलीला उचलून गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो.

यावेळी रस्त्यावरून जाणारे काही लोक त्या मुलीच्या मदतीसाठी धावतात आणि त्या तरुणाला चांगला चोप देतात. तर काही लोक त्या ठिकाणाहून पळ काढतात. या परिस्थितीत लपवून ठेवलेला कॅमेऱ्यात लोकांच्या रिअॅक्शन कै.द होतात. आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहीले की, अशा परिस्थितीत लोक कशाप्रकारे लोकांच्या रिअॅक्ट होतात यावरून देशाची स्थिती नेमकी कशी आहे हे समजतं. अशा गोष्टींवरूनच देशाची प्रगती होत आहे की अधोगती हे समजतं.

हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा आणि विचार करा. या लोकांच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही या मुलीची मदत केली असती की तिथून पळ काढला असता?, असा सवाल दिपांशू काबरा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बापरे!!! व्हिडीओ चालू असतानाच अजगराने डोळ्यावर ह.ल्ला केला अन् मग…; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याच्या नि.धनानं राजकीय वर्तुळात हळहळ

सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

सचिन वाझे प्रकरणात रवी राणांचा खळबळजनक दावा, म्हणाले…