IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”

मुंबई| आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) हे समाज माध्यमांवर नेहमी सक्रिय असतात. ते समाज माध्यमांवर आणि जनसामान्यांत खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते नेहमी चर्चेत असतात.

त्यांचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देतो आणि त्यांच्या पोस्टवर तुफान लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यांनी आपल्या पोस्टमधून अनेकदा अनेकांना भावूक केले आहे.

कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन (Krishna Prakash Mother)  झाले आहे. त्याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आपल्या आईच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत पोस्ट केली आहे.

“आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पाची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलेस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अश्यात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हते. तुझ्याशिवाय मी काहीच नाही”, अशी पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी केली आहे.

दि. 20 ऑगस्ट रोजी त्यांनी तशाच स्वरुपाची एक पोस्ट केली होती. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले होते. आईशिवाय आम्ही आता भिकारी झालो आहोत, असे ते म्हणाले होते.

त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा कमेंट करत आहेत. त्यांच्या पोस्टने त्यांचे चाहते भावूक झाले आहेत आणि त्यांना समाज माध्यमांवर आधार देत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हंटले…

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत विधानसभेत मोठा निर्णय

बिल्कीस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना दणका; विधानसभा सदस्यत्व होणार…

टिपू सुलतान हा ‘मुस्लिम गुंड’ म्हणणाऱ्या नेत्याला जीभ कापून टाकण्याची धमकी