पुणे महाराष्ट्र

इराणी तरुणीला सिगारेटचे चटके द्यायचा, पुण्यातील बड्या उद्योगपतीच्या मुलाला अटक!

पुणे | शिक्षण आणि नोकरीसाठी अनेक मुला-मुलींना आपलं गाव सोडून परागंधा व्हावं लागतं. नव्या गावात जाऊन तिथल्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घ्यावं लागतं. तिथे गेल्यावर अनेक नवीन मित्र मैत्रिणी होतात. चांगली संगत लाभली तर आयुष्याचं कल्याण होतं. मात्र पाय घसरला तर आयुष्याचं माती होते. तरूण वयात अशा परिस्थितीतून जाताना स्वत:ला सांभाळावा लागतं. तोल जाऊ द्यावा लागत नाही आणि जर गेला तर पुण्यासारखी घटना उघडकीस येते.

कोण आहे ही इराणी तरूणी आणि पुण्यात कशासाठी आली होती ??

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. देशाविदेशातून अनेक जण पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अशीच एक इराणमधील 30 वर्षांची परवीन घेलेची ही तरूणी सॉफ्टवेअर क्षेत्रातलं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. चांगलं शिक्षण घेऊन परवीनला नाव कमवायचं होतं.

नेमकी काय ही घटना ?

नोव्हेंवर 2018 मध्ये परवीनच्या एका मैत्रीणीनं धनराज मोरारजी याच्याशी तीची ओळख करून दिली. धनराज हा पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. ओळखीनंतर धनराज आणि परवीन यांच्यात चांगलीच मैत्री झाली. काही दिवसांत मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. काही दिवस धनराजने परवीनला चांगलाच लळा लावला आणि परवीनचा विश्वास संपादन केला. मी तुझी चांगली काळजी काळजी घेईन, तुझा जो काही खर्च असेल तो सगळा मी करेल, असं म्हणतं तीला आपल्या घरी रहायला बोलावलं. तीचं ही त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. तीनेही लगेचंच होकार दिला आणि त्याच्या घरी रहायला गेली आणि इथेच माशी शिंकली.

सुरुवातीचे दोन-तीन दिवस धनराज तिच्याशी चांगलं वागला. मात्र त्यानंतर धनराज किरकोळ भांडण करून परवीनला मारहाण करु लागला. गळ्याला चाकू लावून ठार मारायची धमकी देऊ लागला. एवढ्यावरचं  धनराज थांबला नाही तर त्याने परवीनला सिगारेटचे चटकेही दिले.

या सगळ्या प्रकारानंतर आणि मारहाण केल्यानंतर धनराज तिची माफी मागत असे आणि ती सुद्धा त्याला मोठ्या मनाने माफ करत असे. पण मारहाण दिवसेंदिवस वाढत गेली आणि या प्रकरणाला परवीनने आपल्या मैत्रीणीच्या सहाय्याने वाचा फोडली.

हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं??

22 डिसेंबर रोजी धनराज आणि परवीन कोरेगावातील एका हॉटेलात जेवायला गेले. वॉशरूममध्ये तुला एवढा वेळ का लागला? या किरकोळ कारणावरून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्या भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. अखेर हॉटेल प्रशासनाने मध्यस्थी करत ही भांडण सोडवली. घरी आल्यावर धनराजने परवीनला खोलीत डांबून ठेवले. शेवटी हा प्रकार तीला सहन झाला नाही. तीने आपल्या मैत्रीणीला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. त्या मैत्रीणीने पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. घडलेला सारा प्रकार पोलिसांना कळवला आणि मग पोलिसांनी लगोलग धनराजला बेड्या ठोकल्या.

IMPIMP