इरफान खानला झाला होता मृत्यूचा आभास; शेवटचा श्वास घेत म्हणाला….

मुंबई| गेल्या वर्षी 29 एप्रिल रोजी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचे निधन झाले. काल त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं, या निमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

इरफान खानच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच बाबिल आणि सुतापा यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी इरफान खान यांच्या आजाराची अडीच वर्षे नेमके कसे होते ते सांगितलं आहे.

इरफानचा मुलगा बाबिलने एक खुलासा केला होता. “त्यांचे निधन होण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासून मी रुग्णालयात होतो. त्यांना काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगितली..त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले..’मी मरणार आहे’ आणि मी त्यांना म्हणालो नाही ‘तुम्ही मरणार नाही’. त्यानंतर ते पुन्हा हसले आणि झोपले,” असं बाबिल म्हणाला.

सुतापा म्हणते की,’आम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतोय. एक वर्ष झालंय, पण मी अजूनही लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाही. लोकांना भेटण्यापेक्षा मला लिहिण्यात रमायला आवडतं.’

बाबिल जेव्हा पण वडिलांबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. एका मुलाखतीत त्याने वडिलांना गमावण्याचं दुःख काय असतं ते व्यक्त केलं होतं. बाबिल म्हणतो की,’मी एका सुरक्षित वर्तुळात जगत होतो. इरफानचा मुलगा बनून पण ते वर्तुळ एक दिवस तुटलं. तेव्हा तुमच्याजवळ काही पर्याय राहत नाही. मग तुम्हाला तेच करावं लागतं ते आयुष्याला वाटतं असतं. आणि हेच खरं आहे.’

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांना फिल्मफेअरने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा फिल्मफेअर सोहळ्याला आला होता. या पुरस्कार सोहळ्यात बाबिलने वडिल इरफान खानचे कपडे परिधान केले होते. त्याच्या या कामामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑस्कर 2021 पुरस्कार सोहळ्यात दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खान ज्याने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या छाप सोडली त्याच्यासह सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, भानू अथिया आणि अनेक दिवंगत स्टार्संना श्रद्धांजली वाहिली.

इरफानचा मुलगा बाबील आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

सावधान! कोरोनाची लक्षणं असतानाही ‘या’ कारणांमुळे…

कोरोना काळात आहाराबाबत घ्या ‘ही’ काळजी

जाणून घ्या! ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं…

पतीच्या निधनानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दुसऱ्या लग्नाविषयी…

कोल्हापूरात प्रवाशांवरून रिक्षा चालकांची तूफान हाणामारी,…