मनोरंजन

“इरफान खान आणि ऋषी कपूर गेले, आता पुढचा नंबर कोणाचा मला ठाऊक आहे”

krk

मुंबई | वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणाऱ्या केआरकेने इरफान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं आणि लोकांचा संताप अनावर झाला. यानंतर युजर्सनी केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काही दिग्गजांना घेतल्याशिवाय जाणार नाही, असं मी काही दिवसांपूर्वीच म्हणालो होतो. मी त्या व्यक्तिंची नावे लिहिली नव्हती कारण मग लोक मला शिव्या घालायला लागतात. पण इरफान खान आणि ऋषी कपूर जाणार हे मला माहित होतं. यानंतर पुढचा नंबर कोणाचा, हेही मला ठाऊक आहे, असं केआरके म्हणाला आहे.

केआरकेनं केलेल्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. मात्र प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच केआरकेने ट्विट डिलीट केलं. केआरके कायम त्याच्या नको त्या ट्विटमुळे चर्चेत राहतो. बॉलिवूड स्टार्सवर अनेक वादग्रस्त ट्विट लिहून यापूर्वी त्याने वाद ओढवून घेतले आहेत.

दरम्यान, ऋषी कपूर एचएन रिलायन्स रूग्णालयात भरती आहेत आणि मला त्यांना काही सांगायचं आहे. सर, बरे होऊनच परत या़ निघून जाऊ नका. कारण दारूची दुकाने आता केवळ 2-3 दिवसांतच खुलणार आहेत, असं ट्विट केआरकेने केलं होतं.

kRK

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला

-जास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा तत्वावर घरे विकून मोकळे व्हा- नितीन गडकरी

-मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

-‘आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला’; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

-लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…