इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!

मुंबई |  अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांचं न्यूरोइंडोक्राईन या दुर्धर आजाराने निधन झालं. ते वर्षांचे होते. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली गेलीये. आता त्यांच्या चित्रपटांची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपत्तीवियी देखील चर्चा सुरू झाली आहे.

एनडीटीव्हने दिलेल्या वृत्तानुसा रइरफान खान त्याच्या पश्चात जवळपास 320 कोटींची संपत्ती ठेवून गेल्याचं म्हटलं जातं. या संपत्तीमध्ये त्यांची वैयक्तिक गुंतवणूक, मुंबईतल्या जुहूमध्ये असेला फ्लॅट आणि मुंबईमधील आणखी एक घर तसंच लक्झरी कार अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

इरफान खानने 110 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक देखील केली असल्याचं सांगण्यात येत आहे. ते एका चित्रपटासाठी 15 कोटी कोटींचं मानधन घेत होते. तसंच जहिरातीसाठी 5 कोटी रूपये घ्यायचे. सर्वाधिक आयकर भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव आघाडीवर होतं.

दरम्यान, 29 एप्रिल रोजी इरफान यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आता त्यांची पत्नी सुतापा, आणि बाबील आणि अयान अशी दोन मुलं आहे. तर इरफान यांच्या निधनाच्या फक्त तीन दिवस अगोदर त्यांच्या आईने शेवटचा श्वास घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-किम जोंगची तब्येत धडधाकट… ट्रम्प म्हणतात, मला आता यावर काहीच बोलायचं नाही!

-राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक विषाणू किती गंभीर आहे समोर आलंय; आता शहाणं व्हायची वेळ- संजय राऊत

-“यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तान अन् धर्म-जातीवादाची प्यादी बंद करून आर्थिक प्रश्नावर काम केलं पाहिजे”

-किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!

-राज्य सरकारचं कितीही चांगलं चित्र भासवलं तरी मला ते दिसत नाही- राज ठाकरे