‘या’ अभिनेत्रीच्या चित्रपटातून इरफान खानचा मुलगा बाबील करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

मुंबई| बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील सोशल मीडीयावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करताना पहायला मिळतो.

चाहते अद्याप त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला विसरलेले नाहीत. इरफानचा मुलगा बाबील आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाबीलला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते आणि आता त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली असून अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.

अनुष्का शर्माची निर्मिती असलेला बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. याच चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एक नवीन चित्रपट घेऊन येत असून अनुष्काच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अनुष्का या चित्रपटात एका नव्या अभिनेत्याला संधी देणार आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून इरफान खानचा मुलगा बाबील असल्याची चर्चा रंगली आहे.

रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात बाबीलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले होते. पण, आता तिने ही स्टोरी डिलीट केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे नाव काला आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांना फिल्मफेअरने मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा फिल्मफेअर सोहळ्याला आला होता. या पुरस्कार सोहळ्यात बाबिलने वडिल इरफान खानचे कपडे परिधान केले होते. त्याच्या या कामामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली.

बाबीलने आपल्या सोशल मीडियावरील व्हिडियोमध्ये लिहले आहे की, “माझी आई मला तयार करत आहे. लोक प्रत्येक वेळी सांगतात की, तु तुझ्या वडिलांच्या शूजमध्ये फिट बसू शकत नाही. परंतु, मी त्यांच्या कपड्यांमध्ये फिट असू शकतो. परंतु, मला मिळलेल्या प्रेमामुळे प्रेक्षकांचे आणि इंडस्ट्रीचे आभार व्यक्त करायचे होते.”

दरम्यान, अलीकडेच बाबीलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या डायरीमध्ये इरफानने लेक बाबील याच्यासाठी काही अभिनयाच्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत. लवकरच बाबील बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. बाबीलने लंडनच्या फिल्म स्कूलमधून पदवी शिक्षणही घेतले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

महत्वाच्या बातम्या – 

‘महाभारत’मधील इंद्राची भूमिका साकारणाऱ्या…

बिहारमधील फरार आरोपीच्या घरी बँड बाजासह पोहचली पोलीस; पाहा…

ट्विटरवरील वादानंतरही तापसीनं कंगनाचे मानले आभार, म्हणाली….

चोर गाडी चोरायला आला अन् 82 वर्षीय आजोबांनी त्याला चांगलाचा…

बोंबला! गूगल मॅपमुळे दुसऱ्याच्याच लग्नात पोहचला नवरदेव अन्…; पाहा व्हिडीओ