Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचा मृ.त्यू झाला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृत्यूशी संबंध असल्याचं बोललं जातं आहे.

दिशा सॅलीयन तिचा मित्र दीप अजमेरा सोबत राहत होती. दीप अजमेरा मुंबईमध्ये वाडाळ्यात राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या फ्लॅटवर नाही. एका वृत्त माध्यमानं दिप अजमेराच्या फ्लॅटच्या सेक्युरिटी गार्ड बरोबर संवाद साधला आहे. यावेळी सेक्युरिटी गार्डनं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

दीप या फ्लॅटवर त्याच्या आई वडिलांबरोबर राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीप त्याच्या आई वडिलांबरोबर कुठेतरी बाहेर गेला आहे. दीपनं या फ्लॅटवर कोणालाही येऊ देवू नको असं मला सांगितलं आहे, अशी माहिती दिपच्या गार्डनं दिली आहे.

दीपनं फ्लॅटवर कोणाला येऊ न देण्याचे आदेश का दिले आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी गार्डला विचारला. यावर काहीतरी घोटाळा असेल त्यामुळेच तर त्यांनी कोणाला फ्लॅटमध्ये जावू न देण्याचे आदेश दिले असतील, असं गार्डनं म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी दिशा एका पार्टीमध्ये गेली होती. या पार्टीमध्ये काहितरी असं घडलं होतं ज्यामुळं दिशाचा मृ.त्यू झाला आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच दिशानं आ.त्मह.त्या केली नसून तिला मारण्यात आलं आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

त्या दिवशी दिशाला काही दिग्गज लोकांनी पार्टीमध्ये बोलावलं होतं. दिशाला या पार्टीमध्ये जायचं नव्हतं मात्र ती तिच्या मनाविरुद्ध पार्टीला गेली होती. या पार्टीमध्ये दिशाबरोबर खूप वा.ईट कृत्य घडलं होतं. जेव्हा दिशा पार्टीवरून मलाडला घरी निघाली होती त्यावेळी दिशानं सुशांतला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर सुशांतनं ही सर्व माहिती रियाला दिली. रियानं पुन्हा पार्टीत उपस्थित असणाऱ्या लोकांना सुशांतला सर्व समजल्याचं सांगितलं. दिशा जेव्हा तिच्या मलाड मधल्या घरी पोहचली त्यावेळी सहाजिकच काही लोक दिशाच्या घरी अगोदरच उपस्थित होते. यावेळी दिशाला कोणीतरी धक्का दिला किंवा यावेळी तिच्याबर असं काही घडलं ज्यामुळं तिचा मृ.त्यू झाला, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!

सुशांत प्रकरणी शौविकनं अखेर मौन सोडलं; ‘या’ व्यक्तींच्या नावाचा खुलासा करत दिली महत्वाची माहिती

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतच्या फार्महाऊसवर रियापूर्वी ‘ही’ अभिनेत्री येत होती

सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट