“इक्बाल मिर्ची भाजपचा नातेवाईक आहे का?”, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ईडीने केला आहे. मलिकांच्या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं.

अशातच आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र, विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पक्षांनी गोंधळ घातल्याने पहिला दिवस वादग्रस्त ठरला. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) सुरु झाले असून या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. भाजप जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यात अडथळे आणत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

भाजपने पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार राडा घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावरून देखील नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने पक्षाला दिलेला देणगीचा पैसा कसा चालतो?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

इक्बाल मिर्ची भाजपचा नातेवाईक आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले यांनी भाजपला डिवचलं आहे. त्यावर आता भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचा राजीनामा मागण्याचा भाजपाला अधिकार नाही, असंही नाना पटोेले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील डझनभर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यावेळी फडणवीस यांनी किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले याचे उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध, भाजपला पैसा पुरवणारा…”, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप

भारताच्या प्रयत्नांना यश! युद्धजन्य परिस्थितीत रशिया भारताला मदत करणार

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”