मुंबई | लग्न ठरल्यानंतर भावी पत्नीला काही मेसेज तरूणांकडून केले जातात. या प्रकरणांमध्ये काही वेळा गुन्हे दाखल होतात. याचं प्रकरणी मुंबईच्या न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
लग्न ठरल्यानंतर भावी पत्नीला मेसेज करणं गुन्हा आहे का? या प्रश्नाचे आता न्यायालयाने उत्तर दिलं आहे. भावी पत्नीला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी एका व्यक्तीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा या व्यक्तीवर दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, भावी पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणं हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही. तसेच हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान देखील होऊ शकत नाही.
लग्ना अगोदर होणाऱ्या पत्नीला मेसेज पाठवणं हे एकमेकांच्या भावना समजुन घेण्यासाठी असतात. या कारणास्तव हे संबंधित महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 36 वर्षीय व्यक्तीवर होणाऱ्या पत्नीने लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सुनावणी दरम्यान, न्यायालयाने जर एखाद्या व्यक्तीला समोरची व्यक्ती आवडत नसेल तर समारच्या व्यक्तीला ते सांगण हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे.
तसेच समोरच्या व्यक्तीनेही समजून घेऊन चुक टाळली पाहीजे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. लैंगिक भावना जागृत करण्यासाठी आणि त्याबद्दल जाणून घेण्याकरिता अशा प्रकारचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला कदाचित पटणार नाही. परंतु, या गोष्टीचा अर्थ असा होत नाही की, ते समोरील व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे.
त्याचप्रमाणे होणाऱ्या पतीने पाठवलेल्या अश्लील मेसेजचा उद्देश लैंगिक भावना जागृत करणे हाही असू शकतो. न्यायालयाने म्हटलं आहे की, भावी पत्नीलाही या मेसेजचा आनंद होऊ शकतो.
एका महिलेनं 2010 मध्ये व्यक्तीविरोधात एफआरआय दाखल केला होता. या दोघांची 2010 मध्ये मॅट्रीमोनियल या वेबसाईट वरून भेट झाली होती. घरच्यांचा विरोध असूनही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, या लग्नाविरोधात तरूणाची आई होती. लग्नानंतर तुम्हाला घरात राहू देणार नाही असं तरुणाच्या आईने सांगितलं होतं. त्यानंतर आरोपी तरूणाने होणाऱ्या पत्नीसोबतचं नातं संपवलं.
या प्रकरणावर न्यायालयाने आरोपीला निर्दोष घोषित केलं आहे. तसेच न्यायालयाने म्हटलं आहे की, लग्नाचे वचन देणे आणि ते न पाळण याला धोका म्हणू शकत नाही आणि या कृत्याला बलात्कार देखील म्हणता येत नाही.
लग्नानंतर वारंवार होणारे वाद आणि त्यानंतरची परिस्थिती पाहून तरूणाने पाऊल मागे घेतलं होतं. युवकाने आईचा सल्ला ऐकूण समस्येतुन माघार घेतली. त्याने हे सर्व हाताळू न शकल्याने माघार घेतली. यामुळे हे लग्नाचं आमिष दाखवण्याचं प्रकरण नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, याप्रकरणी तब्बल 11 वर्षांपासून तरूंगात असलेल्या व्यक्तीची तरूंगातुन सुटका झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला
‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल
“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”