पंकजा मुंडे शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या वाटेवर? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं अनेकजण गोंधळात

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा काय घडेल याविषयी काहीही सांगता येत नाही. अलीकडे महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भारतीय जनता पार्टीत कित्येक दशकं काम करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. खडसेंनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू होत्या. मात्र, पंकजा मुंडे यांनी या चर्चांना साफ नाकार दिला आहे. अशातच आता पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सलाम करणारं ट्वीट केलं असल्यानं असल्यानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?, शा चर्चा चालू झाल्या आहेत.

कोरोनाकाळात शरद पवार सातत्यानं आपलं काम करत आहेत. महामा.रीच्या काळातही ते अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत दौरे काढत आहेत. शरद पवार यांच्या याच कामाला पंकजा मुंडे यांनी सलाम केला आहे. यासंबंधीत पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे.

शरद पवार हॅट्स ऑफ…कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपल्या बैठका आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटते. पक्ष, विचार, राजकारण जरी वेगळे असले तरी कष्ट करणाऱ्या विषयीचे आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकज मुंडे यांचं हे ट्वीट वेगानं व्हायरल होत आहे. शरद पवार यांना महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. पवार महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी नेहमीच झटत राहिले आहेत.

गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जागत थैमान घातलं आहे. अनेकजण महामारीच्या भीतीने आपल्या सेफ झोन मधून बाहेर पडण्यास घाबरत होते. मात्र, शरद पवार केव्हाच थांबले नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून आपलं काम केलं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह इतर 72 नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी दीपिकाला मोठा धक्का! ‘या’ व्यक्ती विरोधात होणार कारवाई

‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?

‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…

करीनानं शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूरचा फोटो! नक्की कनेक्शन काय आहे?

खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!