राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार

मुंबई | पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी सकाळी दहा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीये.

अनेकांच्या सभा असतात, त्याच्यावर भाष्य करायचं असतं का? दहा वाजता असो, नऊ असो, आठ असो किती असो राजकीय नेता त्याच्या सोयीनं सभा घेत असतो, त्यावर काय भाष्य करायचं, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज ठाकरेंचा दौरा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे गेल्या काही सभांमधून शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

राज ठाकरे यांनी पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तक खरेदी देखील केली होती. तर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, इतिहास अभ्यासक विश्वास मेंहदळे यांची देखील राज ठाकरेंनी भेट घेतली होती.

इतिहासातील संदर्भाचे दाखले देत राज ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका करणार का हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी 

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर 

“श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडणार”