मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने संपत्ती जप्तीची कारवाई केली होती. दादरमधील फ्लॅट आणि अलिबाग मधील संपत्तीवर ही कारवाई करण्यात आली होती.
ईडीच्या कारवाईनंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. संजय राऊतांनी आज मुंबईत शिवसैनिकांसोबत शक्तीप्रदर्शन केलं.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. अशातच आता खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसैनिकांचं डोकं ठिकाणावर नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील लोकांच्या पैशाचा गैरवापर केला. ते तपासात अडकले आहेत. त्यांचं स्वागत शिवसैनिक करतायेत, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर महाराष्ट्रात असं घडलं नसतं. बाळासाहेबांनी भ्रष्टाचारी लोकांना उभं पण केलं नसतं, असंही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या आहेत.
शिवसैनिकांनी विचार करून गोष्टी केल्या पाहिजेत, असा सल्ला देखील राणा यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना राणांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘प्ले बाॅय’ बनायला गेला अन् 17 लाखाला चुना लागला; झालं असं की…
“गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक
मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं
“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?”
“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत”