Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोजमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच पूनमने कोरोनाकाळात बीचवर केलेल्या फोटोशूटमुळे ती वा.दाच्या घेऱ्यात सापडली होती. याप्रकरणी तिला तु.रुंगात देखील जावं लागलं होतं. अशातच आता पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पूनम पांडेने 2 महिन्यापूर्वीच लग्न केलं आहे. तिच्या लग्नानंतर काही दिवसातच तिने पतीविरुद्ध त.क्रार देखील दाखल केली होती. मात्र, तिने नंतर आपली तक्रार मागे घेतली. अशातच आता ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत.

काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरांनी पूनम गरोदर असल्याचा खुलासा केला होता. डॉक्टरांनी केलेल्या खुलास्यांमुळे तिच्या गरोदरपणाविषयी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, पूनम पांडेने या चर्चांवर काहीही उत्तर दिलं नव्हतं. पुनमनं आता या मुद्द्यावर मौन सोडलं आहे.

पूनम म्हणाली की, मी गरोदर असल्याच्या चर्चांबाबत काही सत्य असेल तर मी स्वतः माहिती देईल. मी खुलेपणाने ते जगाला सांगेल. पूनमने गरोदर असल्याच्या बातमीला नीटसा होकारही दिला नाही किंवा पूर्णपणे नकारही दिला नाही.

दरम्यान, पूनम पांडेनं सप्टेंबर महिन्यात तिचा लॉंग टर्म बॉयफ्रेंड असणाऱ्या सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पूनम पांडेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत त.क्रार दाखल केली होती.

पूनम पांडेनं तिच्या पतीवर मा.रहाण आणि अ.त्याचार केल्याचा आ.रोप केला होता. यानंतर पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला ताब्यात घेतलं होतं. मात्र, सॅम बॉम्बेची जामिनावर सुटका झाली होती.

लग्नानंतर पूनम आणि सॅम दोघेजण हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. हनिमूनला गेल्यानंतर सॅमनं पूनमला मा.रहा.ण केली होती. यामुळे पूनमने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

मात्र, नंतर पूनमनं आपण केलेली त.क्रार मागे घेतल्याचंही सांगितलं होतं. हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेचा सॅमला प्रचंड प.श्चाताप झाला आहे. तो माझ्या समोर प्रचंड रडला यामुळे मी माझी त.क्रार मागे घेतली आहे, असं पूनमनं वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

धक्कादायक! ‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’

धक्कादायक! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

नेहा कक्करने शेअर केला हनिमूनचा ‘तो’ फोटो, चाहत्यांनीही दिलं भरभरून प्रेम

‘बायकोनेच माझ्या खु.नाची सुपारी दिली’; ‘या’ बड्या भाजप नेत्याचा पत्नीवर धक्कादायक आरोप!