कंगना आणि भाजपचा संबंध आहे का? ‘या’ नेत्यानं दिली महत्वाची माहिती

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूपासून अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत आहे. अलीकडच्या काळात कंगनानं बॉलिवूड मधील वाईट गोष्टींसह महाराष्ट्राच्या राजकारणावरही अनेकवेळा निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारवर कंगनानं अलीकडच्या काळात अनेकवेळा निशाणा साधला होता. यामुळे कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मात्र, भाजप नेते प्रवीण दरेकर यांना कंगना विषयी प्रश्न विचारले असता भाजप कंगना पासून दोन हात लांब राहत असल्याचं लक्षात आलं आहे. कंगना राणावत पेक्षाही महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे अगोदर लक्ष द्या, असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

वांद्रे दं.डाधिकारी न्यायालयाने कंगना राणावत विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याच मुद्द्यावर प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र, प्रवीण दरेकर यांनी कंगना राणावतच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. यावेळी दरेकर यांनी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात परतीच्या प्रवासाने हाहाकार माजवला आहे. मात्र, तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसूनच पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी यावेळी महाराष्ट्रातील पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण दौरा करणार असल्याचंही सांगितलं आहे. लवकरच आम्ही महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांत 900 किलोमीटर दौरा करणार आहोत, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र, महाराष्ट्र सरकार आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, असाही आरोप प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी यावेळी जलयुक्त शिवार या योजनेवरही भाष्य केलं आहे. जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेबाबत लवकरच सर्वांसमोर सत्य येईल, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच कोणतीही आपत्ती आली की उठसूट केंद्र सरकारकडे जाऊ नका. राज्य सरकारनेही राज्याची जबाबदारी घ्यावी, महाराष्ट्र सरकारला असा टोला दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ख्रिस गेलने टी-20 मध्ये चौकार आणि षटकार मारून रचला ‘हा’ नवा विक्रम!

‘या’ ठिकाणी रोज 2 तास मिळते केवळ एक रुपयात पोटभर जेवण!

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल