शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं

मुंबई | महाराष्ट्रात राजकारणाचे आणि सत्तांतराचे वारे वाहत आहेत. महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात विद्रोह केला आणि सत्तांतर घडवून आणले.

त्यानंतर आता महाविकास आघाडीत (MVA) देखील धूसफूस सुरु झाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद (Opposition Leader) आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीत वाद झाले.

त्यामुळे काँग्रेस (INC) पक्षाच्या नेत्यांनी वेगळे होण्याचा पवित्रा घेतल्याची भाषा केली आहे. ही बातमी लोकांच्या पचनी पडत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात देखील नेत्यांची नाराजी असल्याची बातमी येत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरुन अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात वाद झाल्याचे कळते. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) मध्यस्ती करत त्यांचे भांडण मिटवले आहे.

शिवसेनेने आणि अजित पवारांनी कोणतीही चर्चा न करता परस्पर विधानसभा विरोधी पक्षनेता आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता ठरविला या कारणावरुन काल (दि. 11) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) देखील नाराज होते.

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद झाल्यातचे कळते आहे.

शरद पवार यांच्या आजच्या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनाच्या कामकाजाची आणि विरोधी पक्षांची भूमिका, राज्यातील कळीचे मुद्दे आदी विषयांवर चर्चा झाली.

शरद पवार यांनी यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत संवाद साधत जयंत पवारांची नाराजी दूर केली आणि सोबत काम करण्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी

‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

“बंडाच्यावेळी शहिद झालो असतो”; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

दीपक केसरकरांचा बंडाबाबत खळबळजनक दावा, म्हणाले…